पाचोरा शासकीय 108 रुग्णवाहिकेला लागली आग
पाचोरा ग्रामीण रुग्णालय परिसर जवळ शासकीय १०८ या बंद रुग्णवाहिकेला अचानक टायर फुटल्याने आग लागली ?की कोणी कचरा पेटून गाडीला आग लागली ? घटना दुपारी 12:10 च्या दरम्यान घडली.रुग्णालय परिसर येथे येणारे जाणारे च्या लक्षात येत पाचोरा नगर पालिका येथील फायारमेन यांना कॉल केला असता गाडीतून धूर निघू लागला. बघता बघता गाडीच्या आगीचे रौद्ररूप धारण केले. या रुग्णवाहिकेला आग लागल्यानंतर या गाडीत सुदैवाने या घटनेत गाडी संपूर्ण जळाली असून. तसेच ही गाडी विझविण्यासाठी पाचोरा नगर पालिका अग्निशमनच्या कर्मचारी राजेश कंडारे, राजू भोसले, दीपक पाटील, फिरोज भाई, यांनी आग विझवणे चे शर्ती चे प्रयत्ने केले. तसेच यावेळी आग लागलेली गाडीजवळ पोलीस निरीक्षक यांनी पाहणी केली असता आग कशामुळे लागली समजू शकले नाही.. यावेळी डॉक्टर,नर्स,आणि पेशंट चे
नातेवाईक,पत्रकार,अग्निशमन विभागाचे कर्मचारीही भयभीत झाले.सुदैवाने कोणालाच इजा झाली नाही.