सावळदबारा येथे डॉक्टर आपल्या दारी अभियान सुरू
लसीकरणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद डॉ. विलास राजपूत
सोयगाव तालुका प्रतिनिधी :-अज्ञानसिंग चव्हाण
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी तसेच खबरदारीचा उपाय म्हणून सरपंच सौ.स्वातीताई कोलते,उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान व पोलीस पा.विलास कुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सावळदबारा व परिसरातील गावामधे उपजिल्हा रुग्णालय सावळदबारा यांच्या सुंयक्त विद्दामाने सावळदबारा येथे डॉक्टर आपल्या दारी अभियान हि मोहीम राबविण्यात येत आहे.
डॉक्टर आपल्या दारी समक्ष भेटी देऊन आँक्सिमीटर,थर्मलगण,इत्यादी सहाय्याने नागरिकांची तपासणी करत आहे. या तपासणी अंर्तगत अंटीजेन टेस्ट, सदीँ,खोकला, डोकेदुखी, घसा,दुखणे, पोटदुखी इत्यादी त्रास असल्यास याबाबत सविस्तर नोंदी घेऊन अभियानातील डॉक्टर उपचारासाठी वैद्यकीय सल्ला देत आहेत.
व कोरोना लसीकरण वय १८ ते ४५ वषाँपर्यंत लसीकरण करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्ती केले जात आहे. नागरिकांनीही अभियानात सहभागी होऊन आपली तपासणी करून घ्यावी. तसेच जे लसीकरण करण्यासाठी पात्र आहेत त्यांनी लसीकरण करून घ्यावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास राजपूत, डॉ. स्वप्निल पाटील यांनी केले आहे.
या अभियान प्रसंगी महादू सोमांसे,(आरोग्य सेवक),शेख मँडम (आरोग्य सेविका),छाया दामोदर(आशासेविका),मजिँना तडवी(आशासेविका),शिक्षकवर्ग, पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य घडत आहे नागरिकांच्या घरोघर जाऊन तपासणी करत असून लसीकरण बद्दल माहिती सांगत आहेत.त्यामुळे लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.