-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे विधानसभा सदस्यत्व निलंबन व्हावे व कठोर कारवाई व्हावी याबाबत एरंडोल वारकरी संप्रदायाचे तहसीलदार यांना निवेदन

 बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे विधानसभा सदस्यत्व निलंबन व्हावे व कठोर कारवाई व्हावी याबाबत एरंडोल वारकरी संप्रदायाचे तहसीलदार यांना निवेदन

एरंडोल प्रतिनिधी
एरंडोल तालुका वारकरी संप्रदाय तर्फे आमदार संजय गायकवाड यांनी वारकऱ्यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसापुर्वी स्थानीक वृत्तपत्रातून उपास तापास करु नका, देव काही करु शकत नाही,मांसाहार करा आदी बोलून समस्त हिंदू समाज वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.वरील विषयावरुन आमदारांना काही कीर्तनकारांनी फोन केला तर त्यांनी अतिशय खालच्या भाषेत शिव्या दिल्या तसेच धर्माची अवहेलना होईल असे उच्चार काढले. तरी अश्या धर्मद्रोही वैचारीक पतन झालेल्या आमदारांना लोकप्रतिनिधी म्हणून हे शोभत नसल्याचे म्हटले आहे . जोपर्यत सदर आमदाराचे निलंबन होत नाही तोपर्यंत हा लढा सुरुच राहणार असल्याचे म्हटले आहे व म्हणून वरील विषयांवर या आमदारावर लवकरात लवकर कारवाई व्हावी.अन्यथा कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर समस्त वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी एरंडोल तालुक्यातील कीर्तनकार भागवताचार्य राजेंद्र महाराज पिंपळकोठेकर, ह.भ.प .संजय जमादार सर, किशोर महाराज कासोदेकर ,ह.भ.प.सुनिल महाराज विखरण, ह.भ.प,रोहीत महाराज विखरण ,ह.भ.प.श्रीकांत पाटील उमरेकर,ह.भ.प. भाऊसाहेब महाराज उमरेकर उपस्थित होते.

advertising articles 2

-->