"अग्गंबाई सुनबाई" मधील दृश्यावर शिंपी समाजाचा आक्षेप
प्रतिनिधी दिपक शिंपी
झी टिव्ही वाहिनीवरील "अग्गंबाई सुनबाई" या मालिकेतील (marathi serial) एका प्रोमोमध्ये कलाकार (artist) शिलाई मशीनला लाथ मारल्याचे दृश्य दाखवण्यात आल्याने टेलर व शिंपी काम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या असल्याने मालिकेच्या लेखक दिग्दर्शकाचा समस्त शिंपी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. (Protest against hurting feelings of tailor community)शिवण मशीनला लाथ मारल्याचे दृश्य
गुरुवारी (ता.२०) मे रोजी रात्री ८-३० वाजता झी टिव्हीवर प्रसारित होणारी 'अग्गंबाई सुनबाई' या मालिकेतील नियमितपणे हाेत असलेल्या एपिसोडमध्ये मालिकेत महत्वाची व्यक्तीरेखा साकारत असलेले अभिनेते अद्वैत दादरकर यांनी समस्त शिंपी समाजाचे उपजीवीकेचे साधन असलेल्या व पुजनीय असलेल्या शिवण मशीनला लाथ मारल्याचे दृश्य दाखवून टेलर शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराजांचा घोर अपमान केला आहे. याचा समाज बांधवांनी जाहीर निषेध केला आहे.
शिंपी समाजातर्फे जाहीर निषेध
या मालिकेचे लेखक,दिग्दर्शक व झी टीव्ही यांचा अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेतर्फे जाहीर निषेध केला आहे. तसेच दिग्दर्शक व झी टीव्हीने समस्त शिंपी समाजाची दुरदर्शनच्या माध्यमातूनच जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी मालिकेचे लेखक, दिग्दर्शक व झी. टीव्हीची राहील असा इशारा शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बागुल, संजय खैरनार, आर.टी.सोनवणे व मध्यवर्ती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.चित्रीत केलेला प्रसंग त्वरीत वगळण्यात यावा अन्यथा समस्त शिंपी समाजाकडून जाहीर आंदोलन छेडले जाईल- रवींद्र बागूल, राष्ट्रीय अध्यक्ष
शिलाई मशीन हा टेलरिंग व्यवसायाचा आणि शिंपी समाजाचा आत्मा आहे, कोरोना काळात या व्यवसायावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असताना झी मराठी या वाहिनीवरील अगं बाई सासूबाई या मालिकेत एका प्रसंगात टेलरिंग व्यवसायाच्या या आत्म्याला म्हणजे शिलाई मशीनला लात मारलेली दिसत आहे. तरी या प्रसंगासाठी आम्ही सर्व शिंपी समाजातील लोक झी मराठी, अगं बाई सासूबाई या मालिकेतील कलाकारांचा, दिग्दर्शकाचा ,अहिर क्षत्रिय शिंपी समाज एरंडोल तालुका संघटना.जाहीर निषेध करत आहोत.
-चि.तुषार शिंपी
जिल्हा उपध्यक्ष:- अहिर क्षत्रिय शिंपी समाज युवक संघटना जळगाव
अहिर क्षत्रिय शिंपी समाज युवक संघटना सर्व पदाधिकारी, जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्ते जळगाव जिल्हा व एरंडोल तालुका
दि. २१ मे २०२१