छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य व शुभम महाजन फ्रेंड सर्कल तर्फे मोफत अन्नदान
मे २५, २०२१
नाशिक प्रतिनिधी
सध्याचा कोरोनाचा काळात छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य व शुभम महाजन फ्रेंड सर्कल च्या वतीने नाशिक शहरातील कोरोणा पॉझिटिव्ह असलेल्या रुग्ण किंवा त्यांचा नातेवाईकांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणुन मोफत घरपोच जेवणाची सोय करून देण्यात आली आहे. यात छत्रपती सेना अध्यक्ष चेतन शेलार,कार्याध्यक्ष निलेश शेलार,कोअर टीम अध्यक्ष तुषार गवळी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रितेश आहेर तसेच शुभम महाजन फ्रेंड सर्कलचे शुभम महाजन यांच्या तर्फे मोफत भोजन वाटन्यात आले