-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कृषि विषयक विविध योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

कृषि विषयक विविध योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव  दि. 10 - राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकातंर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेतंर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाव्दारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. या सुविधेतंर्गत लाभार्थीनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार आहेत. या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी 15 मे, 2021 पर्यंत शेतकऱ्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा, शेतकरी  स्वत:च्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.  वैयक्तीक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधारक्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. 
   यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घ्यावी तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ईमेल वर किंवा .-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन धीरज कुमार, आयुक्त, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.

advertising articles 2

-->