-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

धक्कादायक : कोरोना रूग्णाचे मृतदेह अम्ब्युलन्स चालकाने नदीत फेकले

धक्कादायक : कोरोना रूग्णाचे मृतदेह अम्ब्युलन्स चालकाने नदीत फेकले

कोरोना व्हायरस देशात थैमान घालत असताना काही लोकांच्या चुकीमुळे कोरोना व्हायरस रौद्र रुप धारण करत आहे.

उत्तरप्रदेश आणि बिहार राज्याच्या सीमा भागामध्ये असणाऱ्या बिहारच्या सारण जिल्ह्यातील जयप्रभा पुलावर माणुसकीच्या शत्रूंनी भयंकर कृत्य केलं आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशला जोडणाऱ्य़ा जयप्रभा पूलावर कोव्हिड मृतदेहांना पाण्यात फेकून दिलं जात असल्याची संतापजन घटना समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाहिकांचे चालक रुग्णालयातून आणलेले मृतदेह या ठिकाणी फेकून निघून जातात. आणि प्रशासन सगळं ठीक आहे. असं सांगण्याच्या प्रयत्नात असते.

मांझीचे अरविंद सिंह सांगतात... या मृतदेहांना हे रुग्णवाहिकांचे चालक फेकून निघून जातात.हे 'काम' उत्तर प्रदेश आणि बिहार या दोनही राज्यातील लोक करत असतात. यावर प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी अरविंद सिंह यांनी केली आहे. या संदर्भात NDTV ने वृत्त दिलं आहे.

advertising articles 2

-->