शिक्षण क्षेत्रातील कोरोना योद्धाचाआदर्श शिक्षकाने केला भावपूर्ण सत्कार

शिक्षण क्षेत्रातील कोरोना योद्धाचाआदर्श शिक्षकाने केला भावपूर्ण सत्कार

पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
पारोळा - येथील किसान महाविद्यालयांतील प्रा.डा प्रदीप औजेकर यांचा आरोग्य विभागाशी कांहीही संबंध नसतांना कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत स्थलांतरीत प्रवासी मजुरांना चहा, बिस्किटे तर पत्नी सौ भारती व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तब्बल सहा हजार मास्क आणि प्राध्यापक मित्रांकडून वर्गणी जमवून फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांसाठी फेसशिल्डचे मोफत वाटप केले. आता दुसऱ्या लाटेतही चाचणी व आँनलाईन लसीकरण नोंदणी कार्यात सहकार्य नि रक्तदानही केले.
केवळ सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नि:स्वार्थ भावनेने अविरत मेहनत घेत आहेत.
प्रा औजेकर सरांच्या उल्लेखनीय सेवाभावी योगदानाबद्दल आनंद व अभिमान वाटल्याने येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी आपल्या निवासस्थानी बोलावून शाल श्रीफळ पुष्पहार व‌‌‌ अभिनंदन पत्र देऊन भावपूर्ण सत्कार केला नि पुन्हा एकदा आपली गुणग्राहकता सिद्ध केली.औजेकर सरांनी भावसार सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन आभारही मानले
किसान महाविद्यालयाचे चेअरमन माजी मंत्री डॉ सतीशराव भास्करराव पाटील, प्राचार्य डॉ वाय्.व्ही. पाटील व जि.प. सदस्य  रोहन सतीशराव पाटील सह अनेक मान्यवरांनी प्रा.डा औजेकर सरांचे अभिनंदन करुन भावसार सरांना धन्यवाद दिले.