माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या वाढदिवशी रक्तदान शिबिर संपन्न 40 रक्तदात्यांनी केले रक्तदान
जून ०९, २०२१
पारोळा | प्रतिनिधी | दिलीप सोनार
येथील माजी नगराध्यक्ष श्री गोविंद एकनाथ शिरोळे यांनी त्यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
कोरोना च्या या महामारीत आपण देखील सामाजिक देणे लागतो या भावनेतून त्यांनी रक्तदान शिबिर पारोळ्यात त्यांच्या राहत्या घरी महानुभाव गल्लीत आयोजित केले होते. गोविंद आबा यांनी रक्तदान करून पडद्या मागील कोरोना योध्दा होण्याची हि संधी तरुणांनी सोडू नये. असे आवाहन केले होते. त्याच आवाहनास तरुणांनी साथ देत 40 ब्यागांचे रक्तदान केले. तर निर्णय जनसेवा ब्लड बँक यांनी संकलन केले तर हे शिबिर यशस्वी होण्यासाठी अमोल शिरोळे, विनोद धोत्रे, ईश्वर पाटील, विनोद पाटील, अतुल शिंपी, बाळा महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वाढदिवशी यांच्याही शुभेच्छा...
पारोळा व्यापारी महासंघ, शहर विकास आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बालाजी संस्थान चे ट्रस्टी तसेच आबांच्या मित्रमंडळी यांनी शुभेच्छा दिल्या.