एरंडोल तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेची समिती जाहीर
जून ०९, २०२१
प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी
एरंडोल तालुक्यातील दिनांक 07/06/2021 रोजी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची समिती जाहीर करण्यात आली असुन अशा आशयाचे पत्र तहसिलदार यांचे कार्यालय एरंडोल यांच्या तर्फ़े सर्व नव निर्वाचीत सदस्य यांना पत्र मा.आमदार श्री. चिमणरावजी पाटील यांची देवुन नविन सद्स्यांचा सन्मान केला.तसेच या समितीचे अध्यक्ष मा.आमदार श्री. चिमणरावजी पाटील विधान सभा मतदार संघ हे असुन विद्यमान सदस्य 2) श्री. शरद पिरन ठाकुर रा. निपाणे 3) श्रीमती. सुरेखा देविदास चौधरी रा ,रवंजे ख़ु 4) श्री किरण शांताराम पाटील रा,.बाम्हणे 5) श्री.भानुदास नथु आरखे रा.एरंडोल 6) श्री. आनंदा रामदास चौधरी रा.एरंडोल 7) राजेंद्र बालचंद जोगी रा, गणेशनगर 8) श्री संभाजी जिवराम पाटील रा. विखरण 9) श्री हिम्मत भिला पाटील रा, कासोदा 10) श्री शालिग्राम अर्जुन गायकवाड रा ,एरंडोल 11) गटविकास अधिकारी,पंचायत समिती एरंडोल हे सदस्य असुन दि.08/06/2021 रोजी संजय गांधी निराधार समितिची बैठक नविन सद्स्यांच्या उपस्थित पार पडली
वेळेवर समितीची बैठक होऊन लाभार्थ्यांना लाभ मिळेल अशी अपेक्षा एरंडोल तालुक्यातील लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे एरंडोल तालुक्यातील सर्व जाणकार व सामाजिक कार्यकर्त्यांना समावेश केल्याबद्दल पालक मंत्री गुलाबरावजी पाटील आमदार चिमणराव पाटील यांचे अभिनंदन होत आहे