फरकांडे येथील मा. सरपंच डॉ. शांताराम तानकू वाघ यांचे दुःखद निधन...!
जून ११, २०२१
कासोदा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पृथ्वीराज ( चेतन ) वाघ यांचे वडील डॉ. शांताराम तानकू वाघ यांचे आज संध्याकाळी ०५ : ४५ वाजता जळगाव येथे उपचार घेत असतांना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ०८:०० वाजता फरकांडे ता.एरंडोल येथील राहत्या घरापासून निघणार आहे ,
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मूल, मुलगी , सुष्णा असा परिवार आहे ,
डॉ. वाघ यांचे दोघा मुलांपैकी एक मुलगा वैद्यकीय अधिकारी असून, एक मुलगा परराज्यात डॉ.चे शिक्षण घेत आहे , तर मुलगी जळगाव जिल्हा रुग्णालयात डॉ. आहे , व सुष्णा देखील डॉ.आहे , डॉ.कै.शांताराम तानकू वाघ हे परिसरात डॉ.आबा म्हणून प्रचलित असून , सण २००८ ते १० या कालावधी मध्ये त्यांनी सरपंच पदाची यशस्वी धुरा सांभाळली होती , तसेच डॉ.परिवाराने कोरोना काळात घाबरून न जाता वैद्यकीय सेवा सुरूच ठेवली होती.
या सेवाभावी डॉ.वाघ कुटुंबीयांवर आज दुःखाचा डोंगर कोसळल्याने त्यांच्या दुःखात फरकांडे येथील मा. ग्रा.पं. सदस्य विजय लोहार , उपसरपंच शरद पाठक, ग्रा.पं. सदस्य रविंद्र मन्साराम पाटील , गुड्डू चौधरी, मंगेश चौधरी , राजेंद्र ठाकरे, अभिनव पाटील तसेच पत्रकार राहुल मराठे , पत्रकार हेमराज चौधरी, स्वप्निल खैरनार ( शिंपी) व मित्र परिवार सहभागी आहे