-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

हत्तीरोग उप पथक नेर पिंगळा ई द्वारे गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम.

हत्तीरोग उप पथक नेर पिंगळा ई द्वारे गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम.
.दिनांक २१/६/२०२१
 रोजी नेर पिंगळा ई येथे गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम राबविण्यात आली.सदर मोहीम डॉ.कमलेश भंडारी सर सहाय्यक संचालक (हिवताप व हत्तीरोग) अकोला यांच्या संकल्पनेतून व डॉ.शरद जोगी हिवताप अधिकारी अमरावती,डॉ.सैयद जुनैद सर हत्तीरोग अधिकारी अमरावती,डॉ. जयस्वाल सर तालुका वैद्यकीय अधिकारी मोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.यामध्ये प्रामुख्याने कंटेनर सर्वेक्षण, व्हेंट पाईप ला जाळी बांधणे,साचलेल्या नाल्या,गटारी वाहत्या करणे,डासांच्या अळ्या कुलर,फ्रिज मधील टप मध्ये होऊ न देणे तसेच घरातील कुंडीमध्ये डासांच्या अळ्या होऊ न देणे यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले. हत्तीपाय रुग्णांना किट वाटप करण्यात आली.साथरोग काळ असल्यामुळे हिवताप,हत्तीरोग,डेंग्यू यासारखे आजार होऊ नये म्हणून जैविक पद्धत म्हणून गप्पी मासे नेरपिंग लाई येथे विविध भागात श्री.व्ही. यू. मनवर ग्राम विकास अधिकारी ,सौ.सविताताई खोडस्कर (सरपंच),श्री.मंगेशभाऊ अडणे(उपसरपंच) व इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते सोडण्यात आले. तसेच ग्रामपंचायत नेर येथे बी. टी. आय.पावडर देऊन गावामध्ये फवारणी करण्या संदर्भात सांगण्यात आले.सध्या 1जून ते 30जून हिवताप प्रतिरोध महिना असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये सदर मोहीम राबविण्यात येत आहे.तसेच सहाय्यक संचालक सर यांच्या मिशन 15जुलै रोजी संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.बी.पी.गवई आरोग्य सहाय्यक,श्री.प्रफुल्ल दिवे ,श्री.संदीप भोजने,श्री गोकुल वाको डे, श्री.आनंद मोरे आरोग्य सेवक यांनी परिश्रम घेतले.

advertising articles 2

-->