-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

आनंदनगर तांडा ता एरंडोल येथील विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात शिवसेनेत गटबाजी उफाडली

आनंदनगर तांडा ता एरंडोल येथील विविध विकास कामाच्या  उद्घाटनाच्या कार्यक्रमात शिवसेनेत गटबाजी उफाडली

विशेष प्रतिनिधी एरंडोल

आनंदनगर तांडा येथे विविध विकास कामांचा उदघाटन सोहळा दि 26 रोजी  संध्याकाळी आयोजित केला होता,या कार्यक्रमाचे आयोजक आनंदनगर येथील ग्रामस्थ होते,पालकमंत्री गुलाबराव पाटील कार्यक्रमाला उपस्तीत होते,परंतू स्थानिक आमदार चिमणराव पाटील तालुक्यात असून या कार्यक्रमावर त्यांनी व  त्यांच्या समर्थकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला,मात्र शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी हजर होते,पदाधिकारी,सभापती,जिप व पंचायत समिती चे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला गैरहजर होते, या वादाचे मूळ कारण म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने यांच्या नियुक्तीवरून ही सूदोपसुंदी सुरू आहे,डॉ माने हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे समर्थक आहेत ,एरंडोल तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव पाटील हे आता पालकमंत्री आहेत तर आबासाहेब चिमणराव पाटील विद्यमान आमदार आहेत , दोघे नेत्यांच्या वादामुळे कार्यकर्ते गोंधळात पडले असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे,तालुक्यात आगामी जिप व पंचायत समिती निवडणुकी वर  यांचे परिणाम होतील व पक्षाला आगामी निवडणुकीत  याचे परिणाम भोगावे लागतील असे जनमानसात प्रतिक्रिया उमटत आहेत,गुलाबराव पाटील यांनी आनंदनगर तांडा गावासाठी 82 लाखाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असे त्यांनी कार्यक्रमात जाहीर केले

advertising articles 2

-->