बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा.
जून ०५, २०२१
पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
टिळक शिक्षण संस्था संचालित, पारोळा शहरातील एकमेव सी.बी.एस.ई. बोहरा सेंट्रल स्कूल येथे आज रोजी पालक-शिक्षक संघाच्या उपस्थित जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला .प्रसंगी पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री रावसाहेब भोसले सर उपाध्यक्ष श्री रवींद्र पाटील, एरंडोल व पालक शिक्षक संघाचे सन्माननीय सदस्य डॉक्टर योगेंद्र पवार, सौ बाविस्कर मॅडम,श्री कैलास पाटील, निकाळजे सर यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण करण्यात आले. यात मुख्यत्वे ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा करणारी वृक्ष असे कडुनिंब व इतर झाडे लावण्यात आली. संस्थेचे चेअरमन श्री सुरेंद्रजी बोहरा सर,शाळेचे प्राचार्य शोभा सोनी मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी वृक्षारोपना नंतर लावलेले वृक्ष योग्य प्रकारे संवर्धन करून वाढवण्याचा या पर्यावरण दिनी संकल्प केला.