घरी आलेल्या बाळाला पाहताच, अश्रूंची झाली फुले पाचोरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
जून ०५, २०२१
पाचोरा( प्रतिनिधी शेख जावीद)
दिनांक०६/०६/२०२१
पाचोरा शहरात बाहेरपुरा भागात दिनांक ०५ जून शनिवारी अकरावाजेच्या सुमारास मतिन रज्जाक बागवान यांना एक चार वर्षाचे बालक बेवारस मिळुन आले होते. मतीन बागवान यांनी या बालकाला वीचारपूस केली मात्र ते काहीच बोलत नव्हते व ते अनोळखी वाटल्याने क्षणाचाही विलंब न करता मतीन बागवान यांनी पाचोरा पोलिसांना ही माहिती दिली.माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.किसनराव नजन पाटील यांनी परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, पोलिस उपनिरीक्षक दत्तातय नलावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस काॅन्स्टेबल किरण पाटील, पोलीस नाईक राहुल बेहरे, किशोर पाटील, महिला पोलिस शारदा भावसार अशा पथकास बालकाचे पालकांचा शोध घेणे कामी तात्काळ रवाना केले.
वरील पथकाने मिळुन आलेल्या बालकास ताब्यात घेवुन पाचोरा शहरात त्याचे पालकांचा शोध घेतला. पोलिस पथकाच्या शोध मोहीमे दरम्यान हरवलेला बालक हा शेख रहीस शेख बशीर रा. पाचोरा ता.पाचोरा जि.जळगाव यांचा मुलगा असल्याचे उघड झाले. सदर मिळुन आलेल्या मुलाचे नाव हस्नान शेख रईस (वय – ४) असे सिद्ध झाल्यावर पाचोरा पोलीसांनी वरील मुलाचे पालकास पाचोरा पोलीस स्टेशन येथे बोलावुन हस्नान शेख रईस यास त्यांचे ताब्यात सुखरुप सोपविले आहेत,