पारोळा श प्र -येथील केमिस्ट असो कडून आरोग्य विभाग ,तहसील व कुटीर रुग्णालयास देण्यात आले निवेदन
जून ०५, २०२१
पारोळा श प्र -येथील केमिस्ट असो कडून आरोग्य विभाग ,तहसील व कुटीर रुग्णालयास निवेदन देण्यात आले .यावेळी पारोळा कुटीर रुग्णालयात डॉ योगेश साळुंखे,डॉ राजेश वॉलडे यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की मागील दोन वर्षात कोरोना काळात केमिस्ट असो ने जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा दिली असताना त्यांना अद्याप फ्रंट लाईन वर्कर्स चा दर्जा मिळाला नाही तो मिळावा तसेच तालुक्यातील केमिस्ट सह त्यांच्या परिवारास प्राधान्य क्रमांकाने लसीकरणास प्राधान्य मिळावे या बाबत तहसील ,आरोग्यविभागाने संघटनेचे निवेदन व भावना वरिष्ठांशी चर्चा करून न्याय द्यावा अशी मागणी केली . ,निवेदन देते वेळी असो अध्यक्ष मुकेश गुजराथी माजी ई सी सदस्य अभय पाटील नितीन देसले, उपाध्यक्ष जितेंद्र बाविस्कर ,सचिव शरद वाणी ,कोषाध्यक्ष समीर वैद्य ,सदस्य ,छोटू सोनवणे ,बापू महाजन उपस्थित होते.यावेळी अभय पाटील यांनी प्रशासनाने या बाबत सहकार्य देण्याची भूमिका मांडून सर्व केमिस्ट वर्गाने या बाबत लाभ घेण्याचे आवाहन केले.