पालकमंत्री गुलाबराव पाटील हे त्रास देत असल्याचा - आमदार.चिमणराव पाटील यांचा आरोप
जुलै ०२, २०२१
जळगाव: पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे जळगावमधील शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चिमणराव पाटील हे पारोळ्याचे आमदार आहेत. मी ज्येष्ठ आमदार असून स्थानिक पातळीवर माझे मत विचारात घेतले जात नाही. माझ्या
मतदारसंघातला जिल्हाप्रमुख नेमला गेला मला माहिती नाही ज्या माणसाने आमच्या विरोधात काम केले त्या माणसाला जिल्हाप्रमुख नेमले गेले ज्याच्या गावात राष्ट्रवादी प्लस आहे अश्या स्वक्तीला जिल्हाप्रमुख नेमले गेले असाही आरोप चिमणराव पाटील यांनी केला
गुलाबराव पाटील यांच्याकडून मला डावलले जाते, ही वस्तुस्थिती आहे, असे चिमणराव पाटील यांनी म्हटले त्यामुळे आता जळगावात शिवसेनेचा मंत्री विरुद्ध आमदार, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. गुलाबराव पाटील यांना माझं या भागातील वर्चस्व सहन होत नाही. त्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव घडवण्यात आला. त्यानंतर अजूनही मला अनेकदा डावलण्याचा प्रयत्न होतो. मी शिवसेनेत राहू नये, असे अनेकांना वाटत असल्याचेही चिमणराव पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता गुलाबराव पाटील यावर काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.