घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सटाणा येथे आंदोलन
जुलै ११, २०२१
मोदी सरकारने घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले असून प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता जगायचे कसे ? असा प्रश्न पडला आहे.
केंद्रातील भाजप सरकारने तातडीने इंधनाचे भाव कमी करावेत व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड .रविंद्र पगार यांनी केली आहे.
घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सटाणा येथे शुक्रवार(दि.८)रोजी बस स्थानकापासून तहसीलदार कार्यालयावर जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांच्या नेतृत्वाने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार दीपिका चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सामजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाठ, ओबीसी सेलेचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, डॅाक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॅा.योगेश गोसावी, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, संदिप आहिरे, सम्राट काकडे, सुमित वाघ, सुरेखा बच्छाव, सुयोग आहिरे, सागर वाघ आदींची भाषणे झाली.
अच्छे दिनच्या घोषणेला भुलून निवडून दिलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याचा आरोप माजी आमदार संजय चव्हाण यांनी यावेळी बोलतांना केला.
बैलगाडी मोर्चा तहसीलदार कार्यालयावर पोहचल्यानंतर वरील मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना देण्यात आले.
चौकट:- महागाई वाढवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही..
केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळेच पेट्रोलने प्रति लिटरला किंमतीचे शतक पार केले असून डिझेल शतकाच्या तर घरगुती गॅस हजाराच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महागाईचा भडका उडाला असून “महंगाई को लगातार बढानेवालो, जनता माफ नही करेगी” असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी दिला आहे.
उत्पन्न स्थिर असून मोदी सरकारमुळे सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे जनतेचे “बजेट” बिघडले आहे. त्यातच घरगुती गॅसचे भाव वाढल्याने लोकांवर पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ केंद्र सरकार आणत असल्याचा आरोप देखील जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी केला.
एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या. पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या बैलगाडी मोर्चा प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार, माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार दीपिका चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सामजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाठ, ओबीसी सेलेचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, डॅाक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॅा.योगेश गोसावी, युवक तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, शहराध्यक्ष सुमित वाघ, अमोल बच्छाव, नगरसेविका सुरेखा बच्छाव,महिलाध्यक्षा रेखा शिंदे, आकाश पगार, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, भारत खैरनार, खंडू सोनवणे, खेमराज कोर, अशोक सावंत, संदिप आहिरे, भारत खैरनार, पंचायत समितीचे सदस्य वसंत पवार, संजय पवार, जयवंत सोनवणे, केशव मांडवडे, गणेश पवार, किरण पाटील, राजू सावकार, वंदना भामरे, बाळासाहेब भांगडिया, नामदेव सावंत, रत्नाकर सोनवणे, नितीन भामरे, मेघदीप सावंत, चारुदत्त खैरनार, शशी कोर, राहुल अहिरे, सनिल देवरे, रोहित अहिरे, आकाश भामरे, शरद पगार, योगेश जगताप, तेजस देसले, प्रितम कापडणीस, संदीप अहिरे, संदीप गोतरणे, महेश शेवाळे, दिपक रौंदळ आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.