जवखेडेसिम ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी सौ.सरुबाई सुकदेव भिल यांची बिनविरोध निवड
जुलै ०६, २०२१
एरंडोल तालुक्यातील जवखेडेसिम ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी दिनेश बापू आमले समर्थक नामदेव मोरे यांच्या मातोश्री सौ.सरुबाई सुकदेव भिल (मोरे) यांनी बिनविरोध निवड.
आज जवखेडेसिम ग्रामपंचायत ची उपसरपंच पदासाठी निवड सकाळी 10 ते 2 या वेळात घेण्यात आली ,अध्यासी अधिकारी लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले होते ,उपसरपंच पदासाठी सौ सरुबाई सुकदेव भिल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला,त्याला सूचक म्हणून श्री छगन अभिमन सोनवणे सूचक होते,एकमेव अर्ज आल्याने सौ सरुबाई सुकदेव भिल यांची बिनविरोध निवड अध्यासी अधिकारी लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले यांनी घोषित केली, त्या वेळेस ग्रामसेवक आर.एस. पाटील व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.