कासोदा येथिल युवा पत्रकार सागर शेलार यांची स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या राज्य सहसंघटक पदी निवड...!

कासोदा प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी

येथील महाराष्ट्र शान न्युज चे उप संपादक  तालुका पत्रकार संघाचे सदस्य युवा पत्रकार सागर हिलाल शेलार यांची स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या राज्य सह संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सागर शेलार हे पत्रकारितेच्या  माध्यमातून समाजकार्य करीत असल्याने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती राष्ट्रीयअध्यक्ष नामदेव शेलार यांच्या आदेशांव्ये झाली आहे. 

शेलार हे अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष आहेत.

ही नियुक्ती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार , उपाध्यक्ष / सचिव  गौरव शेलार , राष्ट्रीय संपर्क प्रमुख अफसर शेख , राज्य प्रदेशाध्यक्ष वसंत भगत , उपाध्यक्ष मिलिंद दळवी , राष्ट्रीय प्रवक्ता निलेश जोशी व आदींच्या शिफारसी नुसार सागर शेलार यांची राज्य सह संघटक पदी  नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या निवडीने तालुका पत्रकार संघाचे ता.अध्यक्ष जेष्ठ पत्रकार बी.एस.चौधरी सर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद आण्णा पाटील, पत्रकार जितेंद्र ठाकरे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भिकन चौधरी, संपादक राहुल मराठे, वासुदेव वारे,  शैलेश मंत्री सह , महाराष्ट्र शान न्युज सदस्य, पत्ररकार बांंधव  तथा ग्रामस्थांतर्फे शेलार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या