आडगाव ता एरंडोल
आडगाव ता .एरंडोल : - येथील स्व . स्वातंत्र्य सैनिक कौतीक दगडू पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गावातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले . शिबिराचे आयोजन जिल्हा उद्योग केंद्राचे निवृत्त निरीक्षक नामदेव कौतिक पाटील मित्र मंडळातर्फे करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा . विजयसिंग पवार होते . यावेळी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून पुणे येथील उद्योजक महेंद्र पाटील , कोपरगाव येथील पी .आय. वासुदेव देसले , अधिक्षक कस्टम मुंबईचे गोकूळ पाटील , उपप्राचार्य शाम पवार , प्रगतीशील शेतकरी विलास शिंदे , निवृत्त कृषी अधिकारी सुधाकर पाटील या मान्यवरांनी युवकांना आपल्या जीवनातील कटू प्रसंगाचे उदारणे देऊन यशस्वी कसे झालो व कसे होता येथे जीवनात ध्येय व चिकाटी असली तर शिखर नक्कीच गाठता येते . विविध श्रेत्रातील अधिकारी असल्याने मोलाचे मार्गदर्शन युवकांना लाभले . कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचलन नामदेव पाटील यांनी केले . यावेळी वसंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मधुकर पाटील , माजी ग्रा.प सदस्य शांताराम पवार . डॉ . सुभाष पाटील , राजू फणसे , अनिल पाटील , डॉ . प्रविण वाघ , ग्रा प सदस्य स्वप्निल पाटील आदि उपस्थित होते . गावातील युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते . नामदेव पाटील यांनी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या युवकांना स्पर्घा परीक्षा पुस्तकांचा सेटचे वाटप केले . अंगणवाडी साठी दोन पाण्याच्या टाकी भेट दिली . या उपक्रमाबाबत गावातील नागरिकांनी कौतुक केले . शेवटी आयोजकांमार्फत आभार मानले . कार्यक्रमास बहुसंख्य युवक उपस्थित होते .

0 टिप्पण्या