अमळनेर प्रतिनिधी राहुल भदाणे
अमळनेर येथील आरएमबीकेएस ट्रेड युनियन च्या तालुका अध्यक्ष म्हणून वसंत बैसाने यांची जिल्हाध्यक्ष विक्रम सोनवणे यांनी झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड केली
सविस्तर वृत्त असे की, आरएमबीकेएस या मान्यता प्राप्त ट्रेड युनियनची अमळनेर तालुका येथील पंचायत समितीच्या सभागृहात सर्वसामेशक कर्मचारयांच्या उपस्थित जिल्हाध्यक्ष विक्रम सोनवणे यांचा अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
प्रा जितेश संदाणशिव यांनी प्रास्ताविक केली तर धरणगाव शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाड़े यांनी मार्गदर्शन केले तर याबैठकीत जिल्हाध्यक्ष सोनवणे यांनी संघटनेचे ध्येय धोरण व कर्मचारी हिताचे रक्षण संघटन स्तरावर कश्या पध्दतीने घेतले जाते, याबाबत सविस्तर माहिती दिली. बहुजन समाजाची राष्ट्रीय पातळीवरील ही एकमेव नोंदणीकृत संघटना असल्याने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याने बहुजन समाज या संघटनेच्या नेतृत्वाखाली येऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा देत आहे. संघटना देशपातळीवर कामगारांमध्ये विश्वास निर्माण करण्यात यशस्वी होत असल्याने जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, अशी साद उपस्थित कर्मचारी वर्गाला केली.तर त्यांच्या हाकेला होकार देत अनेकांनी संघटनेत सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार केला. यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी वसंत बैसाने यांची तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामविस्तार अधिकारी चिंचोरे, संजय सैदाने, समाधान निकम, ज्ञानेश्वर निकम, लाबोडे आप्पा ,किशोर वाघ ,अभय मोरे ,समाधान निकम,महेश ठाकुर ,जगदिश पवार, भोई आप्पा ,सुभाष भोई एल डी चिंचोरे,वसंत बैसाणे,अशोक बिर्हाडे ,जितु संदानशिव , ,मनिषा भोई, प्रमिला तायडे, कविता साळुंके,

0 टिप्पण्या