उत्राण (ता. एरंडोल) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिक्षक दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते व विकासोचे संचालक विलास आनंदा महाजन यांच्या हस्ते जिल्हा परिषद उत्राण गुह व अह शाळेतील सर्व शिक्षकांना पेन भेट देण्यात आली.
कार्यक्रमास पत्रकार प्रकाश कुवर, अमोल महाजन, मुख्याध्यापक बळीराम सैंदाणे, कैलास साळुंखे, अनिल पाटील, राजेंद्र पाटील, राजेश सोनवणे, भूषण पाटील, नितीन पाटील, सचिन पाटील, वंदना पाटील, युवराज वानखेडे, मनोहर माळे, प्रदीप खैरणार, विजय पाटील, ओमप्रकाश जळकोटे, अर्चना सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षकांनी विलास महाजन यांचे मनःपूर्वक आभार मानले.
0 टिप्पण्या