जलसंधारण, शिक्षण व सामाजिक परिवर्तनाचे अध्वर्यू — स्व. वसंतरावजी नाईक


(संभाजीनगर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावोद्गार)

महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच परिसरातील विविध विकासकामांचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संभाजीनगर येथे संपन्न झाले.

या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आज दिसणाऱ्या प्रगतीमागे अनेक शिल्पकारांचे परिश्रम आहेत. त्यातील प्रमुख नाव म्हणजे स्व. वसंतराव नाईक. त्यांनी तांड्यांवर राहणाऱ्या बंजारा समाजात मोठी जागृती निर्माण केली, त्यांना शिक्षणाकडे वळवले आणि अनेक संस्थांची उभारणी केली.”

फडणवीस पुढे म्हणाले, “स्व. वसंतराव नाईक यांनी नगराध्यक्ष, आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी समर्थपणे पार पाडली. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवण्याचा मान त्यांना आहे. व्यक्ती किती काळ पदावर राहिली यापेक्षा त्या काळात काय केले हे महत्त्वाचे असते. 1972 च्या दुष्काळात त्यांनी जलसंधारणाचे कार्य हाती घेत महाराष्ट्राला पुन्हा समृद्धीकडे नेले.”बंजारा काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी मंदिराच्या विकासासाठी सरकारने ₹700 कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवीला भेट देणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले. त्यांनी नंगारा संग्रहालयाचे उदघाटन केले असून, या संग्रहालयातील पहिला पुतळा स्व. वसंतराव नाईक यांचाच आहे, असे फडणवीस यांनी अधोरेखित केले.

महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या **वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी)**च्या माध्यमातून बंजारा समाजाला विविध सरकारी योजनांचा लाभ दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणणारी ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमास मंत्री अतुल सावे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री संजय शिरसाट, तसेच खासदार, आमदार आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या