तळईच्या आरोग्य सेविका सौ.ज्योती निकम यांचा जळगावमध्ये गौरव; एरंडोल तालुक्यातून ठरल्या एकमेव मानकरी


जळगाव, दि. १३: जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य सेविकांचा आज जळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य सेविकांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आणि त्यापैकी उत्कृष्ट सेविकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात एरंडोल तालुक्यातील तळई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका (परिचारिका) सौ. ज्योती पवन निकम यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांनी आपल्या कामातून उत्कृष्ट सेवाभावी वृत्ती आणि समर्पण दाखवल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. विशेष बाब म्हणजे एरंडोल तालुक्यातून सन्मानित होणाऱ्या त्या एकमेव आरोग्य सेविका आहेत, त्यामुळे त्यांचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे.
सौ. ज्योती निकम यांनी तळई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांची निष्ठा, रुग्णांप्रतिची बांधिलकी आणि प्रभावी कार्यशैली यामुळे आरोग्य विभागात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यांचा गौरव केल्यामुळे इतर आरोग्य सेविकांनाही प्रेरणा मिळाली आहे. या कार्यक्रमासाठी  डॉ.श्री. किरण पाटील सर(जळगांव जिल्हा शल्य चिकीत्सक),डॉ. सौ. सोनाली राहुल महाजन (संचालिका, चिन्मय हॉस्पिटल, जळगांव),मा. श्री. विष्णुभाऊ भंगाळे (माजी महापौर, म.न.पा. जळगांव)
 ,डॉ. सौ. केतकी ताई पाटील (गोदावरी फाउंडेशन, जळगांव) 
मान्यवर उपस्थित होते.
या सन्मान समारंभाने ग्रामीण भागातील आरोग्य सेविकांच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. सौ. ज्योती निकम यांच्या या यशाबद्दल त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या