स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजन


चाळीसगाव कार्यकारी संपादक योगेश अशोक मोरे 
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की,छत्रपती संभाजी महाराज368 व्या.जयंतीनिमित्ताने 14मे 2025 रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजननाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांच्या हस्ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील प्रतिमेचे पूजन केले. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जयकार केला. 

यावेळी चाळीसगाव सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंजाळ यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आपल्या मनोगतात प्रकाशझोत टाकला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे ,जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका संघटक शेखर पाटील,शहर संघटक किरण जाधव पत्रकार राजेंद्र चौधरी अजिजशेख सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंजाळ ,योगेश पाटील ,आदी अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाज बांधव उपस्थित होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या