जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृभकोतर्फे आडगावात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 

आडगाव, ता. एरंडोल: जागतिक पर्यावरण दिन आणि सहकार वर्षाचे औचित्य साधत कृषक भारती सहकारी संस्था (कृभको) यांच्या वतीने आडगाव येथे सहकारी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. 'एक पेड माँ के नाम' हा उपक्रम यावेळी यशस्वीरित्या पार पडला.

कृभकोचे जळगाव जिल्हा क्षेत्र अधिकारी रवी खूपसे यांनी यावेळी बोलताना, केवळ झाडे लावून उपयोग नाही, तर त्यांचे योग्य संगोपन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे आवाहन केले. कै. आबासाहेब खंडेराव पाटील सहकारी संस्थेच्या सर्व शाखांच्या मोकळ्या जागांमध्ये आणि धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेच्या पटांगणात तसेच सहकारी पेट्रोल पंपाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फ्रुटसेल सहकारी संस्थेचे चेअरमन भगतसिंग शालिग्राम पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी कृभकोच्या या उपक्रमाचे कौतुक केले. संस्थेने आणि शाळेने लावलेली अनेक झाडे आज सुरक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य धीरज पाटील, कपिल पवार, गुलाब जाधव, सुरेश चव्हाण, मुकेश मोरे, हर्षल सूर्यवंशी, किरण कुंभार, अमृत पाटील, मनोहर पाटील यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी खूपसे यांनी केले, तर संस्थेचे मॅनेजर भीकन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या