तामसवाडी येथे लोकेश पवार यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा

तामसवाडी येथे लोकेश पवार यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा


 तामसवाडी ता.पारोळा : येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व शिक्षकनेते स्व. आप्पासाहेब हणमंतराव पवार यांचे नातू लोकेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या बॉईज व कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

वाढदिवस धामधुमीत साजरा न करता समाजासाठी काहीतरी योगदान द्यावे, तसेच शिक्षकनेते स्व. हणमंतराव पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने लोकेश पवार यांनी हा उपक्रम राबविला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण झाला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रोहन पाटील, धुळपिंप्रीचे सरपंच निंबा पाटील, सावखेडे तुर्क येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील रामोशी, माजी सरपंच अनिल पवार, विकास सोसायटीचे माजी चेअरमन प्रमोद पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश रोकडे यांच्यासह अंकुश भागवत, करमाड येथील भावेश पाटील, हर्षल पाटील, मयुरेश्वर पवार, अनमोल पाटील, विवेक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मयूर पाटील तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता.
उपस्थित मान्यवरांनी लोकेश पवार यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.