अंमळनेर प्रतिनिधी सत्तार खान
अमळनेर हुतात्मा दिवसाला अमळनेर न पा मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती तर थकीत पेन्शनच्या मागणीसाठी आलेल्या नागरी हक्क कृती समिती व पेन्शनर सेवानिवृत्त शिक्षकांनी या हलगर्जीपणाचा निषेध नोंदवून घोषणाबाजी केली.नागरी हक्क कृती समितीचे प्रा अशोक पवार,सुखदेव होलार,सत्तार मास्टर,गं.का.सोनवणे,हमीद मास्टर,मोरे गुरुजी,श्रावण गुरुजी ,अजित शेख व सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे आदि नगरपरिषदेच्या कार्यालयात उपस्थित असतानाच राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी हुतात्मा दिवसाचे चे निमित्ताने आज उपस्थित प्रशासन अधिकारी संजय चौधरी ,वसुली विभागाचे शेखर देशमुख आणि सेवानिवृत्त वृद्ध शिक्षक कर्मचाऱ्यांनी यावेळी दोन मिनिटांचे सामूहिक मौन पाळत महात्मा गांधी ना आजरंजली अर्पण केली. यावेळी बोलतांना प्रा अशोक पवार यांनी अमळनेर नगरपरिषदेच्या सेवा निवृत्त शिक्षकांचा थकीत वेतनाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून न पा प्रशासन बाजूला ठेवून दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी आज आम्ही न पा कार्यालयात आलो असताना न पा मुख्याधिकारी शहरात असूनही न पा कार्यालयात आलेल्या नाहीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिवसाला अनुपस्थित राहिल्या तसेच न पा चे प्रमुख लोकप्रतिनिधी पदाधिकारी ही यावेळी अनुपस्थित राहिल्याने निषेध नोंदवला.यावेळी न पा चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी न पा कार्यालयात राष्ट्रपुरुषांच्या जयंती साजरी केली जाते यावेळी सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित राहतात असे नागरिक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.


0 टिप्पण्या