जि.प.शाळा बाम्हणे येथे प्रदीप दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना इंग्लिश प्रायमर पुस्तके व सोनपापडी वाटप

बाम्हणे (ता. एरंडोल) – जिल्हा परिषदेच्या शाळा बाम्हणे येथे शाळा व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य व पिक संरक्षण सोसायटी बाम्हणेचे मा. चेअरमन माननीय श्री. प्रदीप दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना इंग्लिश प्रायमर पुस्तके व सोनपापडीचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला एरंडोल-धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माननीय दादासाहेब श्री. किरण दादा पाटील, एरंडोल तालुका काँग्रेस अध्यक्ष मा. भाऊसाहेब श्री. सुनील गोविंदा पाटील, मा. सरपंच श्री. गोविंदा सजन पाटील, मा. सरपंच श्री. निंबा महाले, उपसरपंच श्री. भास्कर पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. भागवत पाटील, कॉन्ट्रॅक्टर श्री. मुकुंदा पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. महेंद्र रवींद्र पाटील, SMC सदस्य श्री. दिलीप पाटील, श्री. पंकज सनेर, पोलीस पाटील श्री. दिपक ब्राह्मणे, गावातील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, तरुण मित्र मंडळ, विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देत शिक्षणात प्रगती करण्यासाठी प्रेरणा दिली.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या