अमळनेर ऊर्दू निवृत्त शिक्षकांच्या वतीने यु पी एस सी परिक्षा उत्तीर्ण आसिम खान चा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान
अमळनेर येथील ऊर्दू निवृत्त शिक्षकांच्या वतीने 
महाराष्ट्रातील धुळे येथील खान आसिम‌ किफायत खान यांनी *यु पी एस सी* २०२१ मध्ये भारतातून ५५८ रँक मिळवल्याबद्दल धुळे येथे त्याचा घरी जाऊन आसिम खान व त्याचे वडील दोघांचे सत्कार करण्यात आला  
सर्वात महत्वपूर्ण म्हणजे आसिम यांचं संपूर्ण शिक्षण हे उर्दू माध्यमातून झालं आहे. तसेच त्यांनी *यु पी एस सी* ची परीक्षा सुध्दा उर्दू माध्यमातूनच दिली होती. भारतातून उर्दू मध्यामातून परीक्षा पास करणारे ते एकमेव उमेदवार आहेत. यापूर्वी ते मुलाखतीसाठी पात्र ठरले होते पण अंतिम सेलेक्शन झाले नव्हते. पण यावेळेस त्यांनी अंतिम यादीत स्थान मिळवले.
उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी भाषेचा न्युनगंड न बाळगता जिद्दीने अभ्यास केला तर भाषा हा अडथळा ठरत नाही हेच यातून सिध्द होते विशेष म्हणजे असे की *यु पी एस सी* परिक्षा उत्तीर्ण आसिम खान यांच्या वडिलांचे ऊर्दू माध्यमातून शिक्षण अमळनेर येथे झालेले आहे ते पण ऊर्दू निवृत्त शिक्षक आहेत ६२ वर्ष पासुन किफायत खान, यांच्याशी जवळकीचे संबंध असुन ते वर्ग मित्र ही आहेत  यावेळी पिता पुत्र दोघांचे सत्कार अमळनेर ऊर्दू निवृत्त शिक्षक अब्दुल सत्तार मास्टर ,हाजी कादर जनाब ,हमीद जनाब खाटीक व काँग्रेसचे सईद तेली ,यांच्या हस्ते करण्यात आले व आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा ही देण्यात आले
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या