पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
शिवसेना नेते, विधीमंडळ गटनेते तथा राज्याचे नगरविकासमंत्री मा_ना_श्री_एकनाथरावजी_शिंदे यांच्या संकल्पनेतुन, आमदार_मा_आबासाहेब_चिमणरावजी_पाटील यांच्या सहकार्याने पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा_पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वंदनीय_बाळासाहेब_ठाकरे_शिवसेना_वैद्यकीय_मदत_कक्ष व खा_मा_श्री_डाॕ_श्रीकांतजी_शिंदे_फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे करमाड_खु व करमाड_बु ता. पारोळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधांचं वाटप शिबीराचे पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा_अमोलदादा_पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यासमयी करमाड खु येथील ४५० तर करमाड बु येथील ३०० रूग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. याप्रसंगी मा.सरपंच त्र्यंबक पाटील, मा.सदस्य गुलाब पवार, मा.सेवानिवृत्त शिक्षक नामदेव पाटील, करमाड विद्यालय मुख्याध्यापक आर.एम.पाटील सर, उपसरपंच शरद पवार, सदस्य गोपाल पाटील, हेमंत पाटील, समाधान पाटील, सुकदेव पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक हरिचंद्र निकम, मनोहर पाटील, करमाड बु सरपंच सुशिल पाटील, शालेय समिती अध्यक्ष प्रविण पाटील, माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी व वृंद, वैद्यकीय सेवेसाठी धनंजय पाटील, संगिता पाटील, राकेश शिंपी, नितीन साळी, सागर पाटील, गिरिष पाटील, भाईदास ठाकरे आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.


0 टिप्पण्या