-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

पारोळा शहरासह ग्रामिण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर त्वरीत आळा घाला - शहरप्रमुख अशोक मराठे

पारोळा शहरासह ग्रामिण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर त्वरीत आळा घाला - शहरप्रमुख अशोक मराठे

 पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार

पारोळा - गेल्या काही महिन्यांपासुन पारोळा शहरासह ग्रामिण भागात चोऱ्या, अवैद्य दंधे, तस्करी, अवैध दारू विक्री खुप मोठ्याप्रमाणावर सुरू असुन त्याकडे प्रशासन पुर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. यावर सर्व बाबींवर त्वरीत आळा बसावा यासाठी पारोळा शिवसेनेचे शहरप्रमुख अशोक मराठे यांनी तहसिलदार अनिल गवांदे व पोलीस निरिक्षक संतोष भंडारे यांचेकडे केली आहे. यावेळी युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, उपशहरप्रमुख सावन शिंपी, बाळु पाटील, पंकज मराठे, नाना सोनवणे, कुंदन पाटील, संतोष महाजन हे उपस्थित होते. शहरासह ग्रामिण भागात रोख रकमेसह वाहनचोरी, दरोडा, सट्टे-पत्ते, महामार्गावर वाहनांमधुन लोखंड, सिमेंट, इंधन, गॕस इत्यादी वस्तुंची होत असलेली तस्करी, अवैधपणे दारू विक्री खुप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे सर्व प्रशासनाचा नजरेत होत असुन देखील प्रशासन मात्र कुठलीही कार्यवाही करतांना दिसत नाही. यामुळे जनमाणसात भितीचे वातावरण पसरलेले आहे. तसेच अवैध दारू विक्री ही महिलांसाठी व नागरीकांसाठी रहदारी असणाऱ्या रस्यावर केली जाते. याचे चित्र तुम्हाला बस स्टँण्ड पाठीमागील बोगद्याकडे पाहावयास मिळेल. यामुळे महिलांना देखील सदर रस्त्याने वावरणे जिक्रीचे झालेले आहे. तरूण मुल देखिल व्यसनांचा आहारी जात आहेत. त्यामुळे या सर्व बाबींवर बारकाईने लक्ष देवून कडक कार्यवाही करण्यात यावी तसेच यावर त्वरीत आळा बसावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन देण्यात आले.


advertising articles 2

-->