पोलिसांच्या गाडीतून पसार झालेला व पत्रकार रोहिदास दातीर खुन प्रकरणातील मुख्य फरार आरोपी कान्हू मोरे च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या ?
डिसेंबर १०, २०२१
(अहमदनगर प्रतिनिधी) सुनिल नजन
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील संशयित आरोपी आणि दक्ष पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुरीचे पत्रकार रोहिदास दातिर यांच्या खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार कान्हू गंगाराम मोरे (वय४६)याला श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे व उपविभागीय अधिकारी संदिप मिटके यांनी स्वतंत्र पथक तयार करून रंगेहाथ पकडून कान्हू मोरे यांच्या मुसक्या आवळल्या आणि अहमदनगरच्या पोलिस कोठडीत जेरबंद केले आहे. या बाबदची घटना अशी की राहुरीतील दक्ष पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रोहिदास दातीर यांचे एप्रिल महिन्यात अपहरण करून त्यांचा खून केला आला होता.त्यांची पत्नी सविता दातीर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८६/२०२१ कलम १२०ब,३४१,३६३,३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्यात लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी,अक्षय कुलथे,तौफिक मुक्तार शेख यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.कान्हू गंगाराम मोरे याला नेवासा फाट्यावर एका हाँटेलमधून पोलिसांनी अटक केली होती. परंतु कोरोणा झाला म्हणून त्याला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोणा आणि मुतखडा या आजारामुळे मोरे याला पोलीस बंदोबस्तात दि.२८आँगस्टला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात येत असतानाच लघवीचा बहाणा करून पोलीसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला होता. व थेट मध्यप्रदेशमध्ये जाउन राहीला.पोलिसांनी जंग जंग पछाडले पण तो पोलिसांना सतत हुलकावणी देत राहिला. राहुरी तालुक्यातील गुहा फाट्याजवळील मळगंगा मंदिरात वेशांतर करून बाबा बनून साधुच्या वेशात राहिला.तरीही पोलिसांनी तेथेही जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.कान्हू मोरे याला फरार होण्यासाठी मदत करणारे त्याचे नातेवाईक श्रीकांत कचरू मरकड राहणार, निवडुंगे ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर आणि सतीश श्रीकांत हरिश्चंद्रे राहणार धांबोरीखुर्द ,ता. राहुरी जिल्हा अहमदनगर यांनाही या गुन्ह्यात वाढीव कलम २१२ प्रमाणे अटक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरोपी मोरे याला पकडन्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. त्यामधे पोलीस निरीक्षक अनिल कटके,सपोनि सोमनाथ दिवटे,भाउसाहेब काळे,विजय वेठेकर,संदिप पवार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, आकाश काळे,प्रशांत राठोड, गौतम लगड,आणि पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे ईत्यादी पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता.आरोपी मोरे हा अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पसार झाला होता त्यामुळे तोफखाना पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सध्या सदर आरोपी हे तोफखाना पोलीसांच्या ताब्यात असुन नंतर ते राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत अशी माहिती पोलीस सुत्रांकडून देण्यात आली आहे.
मयत ,पत्रकार रोहिदास दातीर