-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून ""भागवत मधुकर पाटील"" यांची मोफत हृदय रोग शस्त्रक्रिया संपन्न.

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून  ""भागवत मधुकर पाटील""  यांची मोफत  हृदय रोग शस्त्रक्रिया संपन्न.


प्रतिनिधी नूरुद्दीन मुल्लाजी
 भागवत मधुकर पाटील वय : ४५ वर्षे पत्ता : हिंगणे बु . ता. जामनेर. जि. जळगाव 

 श्री भागवत पाटील यांना चालताना दम लागत असे. आणि छातीत त्रास होत असल्यामुळे त्यांनी जवळपास 6 ते 7 महिने पासून सरकारी.खाजगी असे अनेक हॉस्पिटलमध्ये त्यांनी तपासणी केली . डॉक्टरानी त्यांना  हृदयाशी संबंधित चाचण्या करण्यास सांगितल्या. यामध्ये ईसीजी , टू डी इको करण्यात आली.रिपोर्ट मध्ये भागवत पाटील यांना हृदयाला होल आहे असे सांगण्यात आले. खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना 3 ते 4 लाख खर्च सांगण्यात आला. त्यांनी काही सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रयत्न केले.परंतु हॉस्पिटल वाले फक्त ऑपरेशन ची तारीख वर तारीख देत होते. परंतु भागवत पाटील यांचे ऑपरेशन काही झाले नाही.  भागवत पाटील त्यांचे कुटुंबीय हताश झाले होते.त्यांचे एरंडोल चे नातेवाईक श्री रतिलाल पाटील ( पत्रकार ) यांनी आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क केला . भागवत पाटील यांना तेरणा हॉस्पिटल ला जाण्यासाठी सांगितले. आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी हॉस्पिटल मध्ये कॉल वर सांगितले. 

श्री भागवत पाटील यांची परिस्थिती नसल्याकारणाने पुढील उपचार आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत झाले पाहिजे.  त्यांना सर्व रिपोर्ट घेऊन   हॉस्पिटल नेरुळ या ठिकाणी जाण्यास सांगितले. तेरणा हॉस्पिटल मध्ये भागवत पाटील यांना त्या दिवशी ॲडमिट करण्यात आले. त्यांचे सर्वे रिपोर्ट बघून परत डॉक्टरांनी त्यांना टू डी इको चा रिपोर्ट मोफत करून घेतला .डॉक्टरनी त्यांना ऑपरेशन चा काही धोखा नाही आहे. आणि डॉक्टरांनी दोन. तीन दिवसात त्यांची बॉडी फिटनेस करून. त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया सक्सेसफुल झाल्यानंतर भागवत पाटील यांना तीन चार दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून. सुट्टी करण्यात आली भागवत पाटील यांना हॉस्पिटल मध्ये सर्व उपचार मोफत मध्ये करण्यात आले. भागवत पाटील आता त्यांच्या परिवारासोबत ठणठणीत आहेत. श्री भागवत पाटील यांच्या कुटुंबीयांनी आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचे खूप खूप आभार मानले

advertising articles 2

-->