कासोदा |नंदराम दगडुराम मंत्री पिक संरक्षक सोसायटी संस्थेच्या चेअरमनपदी आनंदा वामन चौधरी तर व्हा.चेअरमनपदी केदारनाथ शंकरलाल सोमाणी यांची बिनविरोध निवड
डिसेंबर ०७, २०२१
कासोदा | येथील नंदराम दगडुराम मंत्री पिक संरक्षक सोसायटी कासोदा या संस्थेच्या चेअरमनपदी आनंदा वामन चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचें नावाची सूचना केदारनाथ सोमाणी यांनी मांडली त्यास संतोष कौतिक पाटील यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हा. चेअरमनपदी केदारनाथ शंकरलाल सोमाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचें नावाची सूचना राजाराम जमादार यांनी मांडली त्यास अनुमोदन आशाबाई पंडित पाटील यानी दिले.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून संजय पाटील सहकार अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था एरंडोल यांनी कामकाज केले.सदरसंस्थेतएकुण १३ संचालक सन२०२१ ते २०२६ या पांच वर्षासाठी बिनविरोध निवडले गेले.
सदर निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी ग्रा.पं.सदस्य नरेश ठाकरे, प्रशांत पारधी, रमेश जमादार, भाईदास पाटील यांचेसह सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थीत होते.