-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कासोदा येथे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल

कासोदा येथे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल

प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी

कासोदा तालुका एरंडोल: येथे दुपारी 1:00 वाजेच्या सुमारास जळगाव येथील गुन्हा शाखेच्या वतीने नायलॉन मांजा विक्री प्रकरणी कासोदा येथील वसंत किराणा स्टोअर्सचे मालक किरण व संत वाणी व योगेश जनरल स्टोअर्सचे मालक योगेश सुभाष वाणी यांच्याविरुद्ध जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सतीश प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत भगवान तुकाराम पाटील पोलीस नाईक जळगाव गुन्हे शाखा, नंदलाल दशरथ पाटील, राहुल बैसाणे यांनी सदर कारवाई केली. कारवाई करतेवेळी दोघा दुकानांमध्ये 1038 रुपयाच्या प्लास्टिक पिशवी मध्ये ठेवलेले नायलॉन माझा प्रत्येकी दहा रुपये किमतीचे शंभर बंडल कारवाई करतेवेळी आढळून आले. पुढील तपास कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल युवराज कोळी हे  करत आहेत.


advertising articles 2

-->