कासोदा संकल्प इंडियन गॅस कडून जादा दराने गॅसहंडी विक्री करून ग्राहकांची फसवणूक

कासोदा ता, एरंडोल:( प्रतिनिधि) नुरुद्दीन मुल्लाजी

माहिती अधिकारात कासोदा संकल्प इंडियन गॅस चे पितळ उघडे.जागेवर जादा दराने गॅस हंडीविक्री.माहिती अधिकारात कासोदा संकल्प इंडियन गॅस चे पितळ उघडे.

येथील संकल्प इंडियन गॅस एजन्सी शासकीय दरा प्रमाणे गॅस हंडी न विकता जादा दराने विकतात

 कासोदा येथील गॅस एजन्सी कडून ग्राहकांची लूट आडगाव येथील रहिवासी व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास( अण्णा हजारे पुरस्कृत ) चे तालुका प्रतिनिधी  शांताराम नामदेव पवार यांना समजल्यावर त्यांनी  दिनांक1 नोव्हेंबर 2021रोजी  माहिती अधिकारात माहिती मागितली असता ती माहिती प्रथम अपिलीय अधिकारी यांनी त्यांना माहिती उपलब्ध करून दिली. त्यात दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत 905 रु. त,शासकीय दराप्रमाणे   हंडी दिली जाते व सदर हंडी  एजन्सी वरून  स्वतः घेऊन गेले तर त्याचे दर आहेत.875:51 रुपयात मिळेल, तसेच शासकीय नियमानुसार अंतर वाढले तर त्याचे जास्तीचे किती रुपये देणे बंधनकारक आहे. तर यावर संकल्प इंडियन गॅस कडून माहिती देताना सांगण्यात आले की कार्यक्षेत्रात बाहेरचे दर आकारले जात नाही 905 रुपयाला हंडी दिली जाते. असे असतानाही आज रोजी ही कासोदा येथे संकल्प इंडियन गॅस कडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट होत  आहे. घरपोच थंडीचे 905 रुपये असताना. सदर हंडी घेऊन गेलेले कर्मचारी 905 रुपये व्यतिरिक्त गावात दहा ते पंधरा रुपये जास्त घेत असल्याची चर्चा आजही सुरू आहे. बाहेर गावी गेले तर पंचवीस-तीस रुपये जादा घेतले जात आहेत. दिनांक 12 जानेवारी रोजी   येथील पत्रकार राहुल शिंपी हे स्वतः गॅस हंडी घेण्याकरता एजन्सीवर गेली ते स्वतः हंडी एजन्सी वरून घेऊन गेले. तरी त्यांना सदर हंडी चे 875 रुपये 51 पैसे ऐवजी 905 रुपये घेऊनच पावती  देण्यात आली . तशाच आशयाची पावती नाद खुर्द बुद्रुक येथील रहिवासी अनिल  पाटील यांनाही गेल्या आठवड्यात देण्यात आली आहे.  तरी यापुढे गावात असो की

  खेड्यांवर  घरपोच हंडीचे प्रत्येकाने 905 रुपये द्यावे. असे आव्हान अण्णा हजारे पुरस्कृत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास चे तालुका प्रतिनिधी शांताराम पवार यांनी केले आहे. आणि जर गॅस एजन्सी धारक तुम्हाला शासकीय दराप्रमाणे हंडी देत नसेल तर आपण थेट तहसीलदार एरंडोल अथवा पुरवठा अधिकारी एरंडोल त्यांच्याशी अथवा माझ्याशी व्यक्तिगत 9021517011 या नंबर वर संपर्क साधावा. असे आव्हान करण्यात आले आहे.

 त्याचप्रमाणे इतर माहिती मागण्यात आली होती नवीन कनेक्शन साठी 5645 रुपये, व सिंगल हंडी वाल्याने डबल हंडी करण्याचे ठरवले तर त्यासाठी किती रक्कम द्यावी लागेल. त्यासाठी  2573 रुपयेदेणे बंधनकारक आहेत. तरी यासाठी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या