प्रतिनिधी – प्रकाश कुंवर, उत्राण
उत्राण (ता. एरंडोल) येथे कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गोरोबा कुंभार महाराज यांची जयंती भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली.
गावातील हनुमान मंदिर, महादेव मंदिर आणि संत गोरोबा कुंभार महाराजांच्या स्मारकाची नित्यसेवा करणारे महादू दौलत पाटील यांच्या हस्ते संत स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर नारायण कुंभार व चिंधा कुंभार यांच्या हस्ते महादू पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये रघुनाथ कुंभार, लक्ष्मण कुंभार, निंबा कुंभार, पिरा कुंभार, विश्वनाथ कुंभार, जनार्दन कुंभार, संतोष कुंभार, कृष्णा कुंभार, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र महाले, तसेच बाळू कुंभार, मधुकर कुंभार, गोविंदा कुंभार, कैलास कुंभार, प्रकाश कुंभार, दत्तू कुंभार, भास्कर कुंभार, शांताराम कुंभार, बापू कुंभार, जगन कुंभार, नारायण महाले यांचा समावेश होता.
0 टिप्पण्या