आधार आदिवासी सेवाश्रमात वाढदिवसाचे अनोखे रूप : सालेय साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम

धुळे : "आपला वाढदिवस आपण दरवर्षी नातेवाईकांसोबत साजरा करतो, पण ज्या कोवळ्या निराधार मुलांचं या जगात कोणीही नाही, त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करून जे समाधान मिळते, ते शब्दांत मांडता येत नाही," अशा भावस्पर्शी भावना आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या.

जितेंद्र पाटील यांनी आपला वाढदिवस आधार आदिवासी सेवा आश्रमातील मुलांसमवेत साजरा करत सालेय साहित्य व खाऊ वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम राबवला. त्यांच्या या सामाजिक जाणिवेने भरलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक मान्यवरांनी त्यांच्या पुढाकाराचे स्वागत केले.

कार्यक्रमात शिवतेज माहिती अधिकार व पत्रकार संघटना तसेच आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

जितेंद्र पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवेचे कार्य करत असून, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आरोग्य तपासणी, उपचार व मोफत शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करून हजारो रुग्णांना मदतीचा हात दिला आहे.

या सेवाभावी कार्याबद्दल धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार श्रीकांत शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, नगरसेवक नवीनसेठ गवळी, उमेशदादा गुंजाळ, रवींद्रदादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा पत्राद्वारे त्यांच्या कार्याचे कौतुक केले असल्याचे संस्थेचे सहसचिव संदीप ब्रम्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.

हा उपक्रम समाजात सेवा, संवेदना व जबाबदारी या मूल्यांची जाणीव निर्माण करणारा ठरला आहे.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या