जवखेडे सिमच्या श्रीमती ज्योती निकम यांचा जिल्हा पातळीवर गौरव


जवखेडे सिम (ता. एरंडोल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत असलेल्या परिचारिका श्रीमती ज्योती निकम यांनी कुटुंब कल्याण कार्यक्रमात अत्यंत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. भायेकर सर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
हा गौरव सोहळा जिल्हा परिषद, जळगाव येथे मोठ्या औत्सुक्याने पार पडला.

श्रीमती ज्योती निकम या आरोग्य क्षेत्रात अतिशय समर्पितपणे सेवा बजावत असून, महिलांचे आरोग्य, कुटुंब नियोजन, जनजागृती आणि मातामृत्यू दर कमी करण्यासाठी त्यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीची ही दखल जिल्हा पातळीवर घेतली गेली आहे, याचा संपूर्ण एरंडोल तालुक्यासोबतच जवखेडे सिम गावालाही अभिमान वाटतो.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या