चाळीसगावात नवे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांचा महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटनेतर्फे सत्कार


चाळीसगाव प्रतिनिधी– चाळीसगाव शहरात नुकतेच पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेल्या अमित कुमार मनेळ साहेब यांचा महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटना तर्फे सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश मोरे यांनी पोलीस निरीक्षक मनेळ साहेबांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली व संघटनेच्या कार्याची माहिती दिली.

संघटनेच्यावतीने पोलीस निरीक्षकांना कायदे व सुव्यवस्थेच्या महत्त्वावर चर्चा करून, पत्रकार व पोलीस यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने संवाद साधण्यात आला.

या कार्यक्रमास भुरण घुले (जेष्ठ सल्लागार )
विजय सपकाळे (जेष्ठ सल्लागार ), 
मुस्ताक पिंजारी (जेष्ठ सल्लागार ), 
किशोर जाधव (महाराष्ट्र संपर्क प्रमुख ),
जाकीर मिर्झा (तालुका अध्यक्ष),
जितेंद्र महाले(तालुका अध्यक्ष ग्रामीण),
योगेश्वर राठोड(जिल्हा संघटक),
यश पालवे (शहर अध्यक्ष ), 
कैलास पाटील(शहर उपाध्यक्ष), 
गयास शेख (शहर सदस्य),
सत्यजित पाटील ( शहर सदस्य)  यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या