समाजसेवेचे स्वर्णकार – आदरणीय केशवशेठ भामरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

कासोदा – दिपा ज्वेलर्सचे यशस्वी संचालक आणि कासोदा गावातील सामाजिक भान जपणारे आदरणीय केशवशेठ भामरे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या केशवशेठांनी केवळ सोनं विकून नाही, तर समाजासाठी "सोनेरी" कार्य करूनही आपलं नाव गाजवलं आहे.

व्यवसायात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि ग्राहकसेवेच्या तत्वांमुळे दिपा ज्वेलर्स हे नाव आज विश्वासाचं प्रतीक ठरलं आहे. परंतु केवळ व्यावसायिक यशापुरतंच मर्यादित न राहता, केशवशेठ भामरे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपला मोलाचा वाटा उचलला आहे.

 तसेच त्यांच्या प्रयत्नातून आणि माजी आमदार चिमणराव पाटील व आमदार अमोलदादा पाटील यांच्या सहकार्याने  कासोदा येथे समाजासाठी मोठे भव्य दिव्य मंगल कार्यालयाचे काम चालू आहे या त्यांचा मोलाचा वाटा आहे 

त्यांच्या अमूल्य योगदानामुळे आज त्यांचं नाव महाराष्ट्र पातळीवर आदराने घेतलं जातं. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून, सामाजिक संस्थांकडून, कासोदा गावातील नागरिकांकडून आणि त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

🔸 सर्व सोनार समाज, कासोदा यांच्यावतीनेही केशवशेठ भामरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. समाजासाठी त्यांनी केलेले कार्य अनमोल असून, त्यांचं मार्गदर्शन हे सदैव प्रेरणादायी ठरेल.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या