उत्राण वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी पंकज महाजन, व्हा. चेअरमनपदी सुमनताई पाटील यांची बिनविरोध निवड


उत्राण (ता. एरंडोल) येथे आज उत्राण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडीत श्री. पंकज प्रकाश महाजन यांची चेअरमनपदी तर सौ. सुमनताई गोविंदा पाटील यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. पी. जे. पाटील यांनी काम पाहिले. या वेळी माजी सभापती अनिल महाजन, एरंडोल शेतकी संघ सदस्य सौ. सुमनताई पाटील, बाळुआण्णा धनगर, गुरुदास चौधरी, पांडुरंग जाधव, अमोल महाजन, रघुनाथ कुंभार, विलास महाजन, ईश्वर धनगर, विजय महाजन, ज्योती महाजन, संजय महाजन, ज्ञानेश्वर पाटील, भारत देवरे, महादु कोळी, धनराज पाटील, हारूण देशमुख आदी मान्यवर व सदस्य उपस्थित होते.

निवडणूक कामकाज सचिव मधुकर पाटील आणि लिपिक राजू गुरव यांनी उत्तमरित्या पार पाडले. या निवडीबद्दल नविन चेअरमन पंकज महाजन आणि व्हा. चेअरमन सुमनताई पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या