"सेवा हीच संघटनाची खरी ओळख" या ब्रीदवाक्याला अनुसरून, भाजप कार्यकर्त्यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते आणि याच सेवाभावातून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करत कार्यकर्त्यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली.
या शिबिराला तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस नरेश ठाकरे, संजय चौधरी, भूषण पाटील, नरेंद्र आबा पाटील, ऋषिकेश भाऊ पाटील, शहराध्यक्ष छोटू शिरसागर, तालुका उपाध्यक्ष सुरेश पाटील, जितेंद्र चौधरी, नितीन पाटील, दीपक पाटील, गुलाब पाटील, कोषाध्यक्ष देवेंद्र देशमुख, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष राहुल चौधरी, भूषण पाटील, मिलिंद मोरे, तसेच युवा मोर्चा उपाध्यक्ष नामदेव पाटील, सागर पाटील आणि इतर अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिरामध्ये तरुण कार्यकर्त्यांनी रक्तदान करत समाजहिताचे कार्य हाती घेतले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, गावातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत भाजपाच्या सामाजिक जाणिवेचे अभिनंदन केले.
शिबिराचे आयोजन अतिशय सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते. शिस्तबद्ध व्यवस्था, आरोग्य नियमांचे पालन आणि सुसज्ज व्यवस्थापन यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
या माध्यमातून भाजपाने फक्त वाढदिवस साजरा न करता, समाजासाठी उपयुक्त असा सेवायज्ञ घडवून आणला. अशा उपक्रमांमधून पक्षाचे सामाजिक भान आणि जबाबदारी अधोरेखित होते. भविष्यातही असे विधायक उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या