चाळीसगाव (ता.22 जुलै) – उपसंपादक योगेश मोरे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचा वाढदिवस चाळीसगाव तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी कलंत्री विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यात अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
त्याआधी 21 जुलै रोजी मातोश्री फिटनेस अँड वेलनेस सेंटर तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये शेकडो नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
तसेच टाकळी प्रचा, रामनगर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या सर्व उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पुढील कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले:
तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, युवती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अभिलाषाताई रोकडे, महिला तालुकाध्यक्ष सोनालीताई देऊळकर, महिला जिल्हा कार्याध्यक्ष स्वातीताई राजपूत, युवती जिल्हाध्यक्ष मोनालीताई पवार, महिला शहर अध्यक्ष निर्मलाताई चौधरी, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष किशोरभाऊ जाधव, तालुका कार्याध्यक्ष नितीन भामरे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र राठोड, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष रवींद्र महाजन, युवक तालुकाध्यक्ष करण पाटील, युवक तालुका उपाध्यक्ष भूषण देशमुख, संकेत देशमुख, हर्षल देशमुख, असलम शेख, सुखदेव राठोड, साहेबराव जाधव इत्यादींचा मोलाचा सहभाग लाभला.
या उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण साकारण्यात आले असून अजितदादा पवार यांचा वाढदिवस एक प्रेरणादायी सामाजिक उत्सव ठरला.
0 टिप्पण्या