बाम्हणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

बाम्हणे (ता. एरंडोल) : बाम्हणे येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मा. भागवत दादा पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेंद्र रवींद्र पाटील, मुख्याध्यापक नंदलाल पाटील सर, योगेश पाटील सर, भटू पाटील सर, भूषण पाटील सर आणि सौ. पुनम पाटील यांनी केले.

या वेळी पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन प्रदीप भाऊ पाटील, दिलीप पाटील, कैलास पाटील, ग्रा.प. उपसरपंच भास्कर पाटील, ग्रा.प. सदस्य भागवत पाटील, पो.पा. दीपक ब्राह्मणे, उत्राण ग्रा.प. सदस्य राजू पवार, माजी ग्रा.प. सदस्य नारायण पाटील, श्याम पाटील, विठ्ठल जाधव, अमोल पाटील, बबलू पाटील, अजय पाटील, महेंद्र पाटील, रवीदादा भिल, तात्याभाऊ, सागर पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या