चाळीसगाव (ता.२६ जुलै २०२५):
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चाळीसगाव शहरातील घाटे कॉम्प्लेक्स, भडगाव रोड येथे नवे मध्यवर्ती कार्यालय आज भव्य उत्साहात उद्घाटन सोहळ्याने लोकार्पण करण्यात आले.
या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील (अमळनेर विधानसभा) हे होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब उर्फ श्री. संजय पवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष श्री. योगेश देसले यांची उपस्थिती होती.
या वेळी उपस्थित तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांनी पक्ष संघटन व बांधणी तसेच सामान्य कार्यकर्ते व नागरिकांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांची यादी:
मा. श्री. अनिलदादा पाटील (आमदार – अमळनेर विधानसभा)
मा. श्री. संजय (भाऊसाहेब) पवार – जिल्हाध्यक्ष व अध्यक्ष, जिल्हा बँक
मा. श्री. योगेश देसले – जिल्हा कार्याध्यक्ष
मा. भाऊसाहेब पाटील – तालुका अध्यक्ष
मा. अरविंद मानकरी – जिल्हा अध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग
मा. मंगेश सावळे – तालुका सरचिटणीस
मा. नितीन भामरे – तालुका कार्याध्यक्ष
मा. राजेंद्र राठोड – तालुका उपाध्यक्ष
मा. रवींद्र महाजन – तालुका अध्यक्ष, ओबीसी सेल
मा. सोनाली देऊळकर – तालुका अध्यक्षा, महिला
मा. गोकुळ पाटील – तालुकाध्यक्ष, किसान सेल
मा. किशोर जाधव – जिल्हा कार्याध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग
मा. समाधान पाटील – शहराध्यक्ष
मा. दीपक शिंदे – शहर उपाध्यक्ष
मा. दीपक चौधरी – शहर कार्याध्यक्ष
मा. कुशाल देशमुख – प्र. युवक सरचिटणीस
मा. करण पाटील – तालुका अध्यक्ष, युवक
मा. कुशाल मोरे – तालुका अध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग
मा. बापू आमले – तालुका उपाध्यक्ष
मा. अभिलाषा रोकडे – अध्यक्षा, उत्तर महाराष्ट्र युवती
मा. सोनाली गुरव – महिला विभाग, विधानसभा क्षेत्र प्रमुख
मा. सुवर्णा सोनार – सरचिटणीस
मा. स्वाती देवरे – जिल्हा कार्याध्यक्ष, युवती
मा. निर्मला चौधरी – शहराध्यक्षा
श्री. संदीप पाटील, साहेबराव मेंबर, रघु पाटील, विलास पाटील, भूषण देशमुख, विकास राठोड व असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले. या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन, संवाद आणि संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

0 टिप्पण्या