-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

बाम्हणे येथील एकवीस वर्षीय तरुणाचा नदीत पाय घसरून मृत्यू

बाम्हणे येथील एकवीस वर्षीय तरुणाचा नदीत पाय घसरून मृत्यू


एरंडोल तालुक्यातील बाम्हणे येथील योगेश मनोज पाटील वय 21 वर्ष हा युवक आज गुरे चारण्यासाठी गेला असता दुपारी तीन वाजेच्या सुमारास गुरे चारत असताना ढोली नदीवर गेला असता नदीकाठी फिरत असताना त्याच्या पाय घसरल्यामुळे तो नदीत पडला त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला गावातील ग्रामस्थांनी योगेश पाटील यास बाहेर काढून त्यास एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तन्मय महाले यांनी त्याला तपासले असता तो मयत झाल्याचे त्यांनी सांगितले. मयत योगेश पाटील हा अत्यंत हुशार होता बीएससी पास होऊन तो एम एस सी च्या प्रथम वर्गात शिकत होता योगेश चे वडील मनोज भीमराव पाटील हे शेतकरी असून त्यांना दोन मुले एक मुलगी आहे योगेश पाटील हा परिवारातील मोठा मुलगा होता तो शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होता. त्याच्या निधनाने गावात एकच शोककळा पसरली. याबाबत कासोदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्याचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते योगेश याचे शविच्छेदन एरंडोल येथे करण्यात आले. शविच्छेदन नंतर श नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. असंख्य लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा योगेश यास शेवटचा निरोप देण्यासाठी असंख्य लोक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन श्रद्धांजली दिली

advertising articles 2

-->