धक्कादायक धारदार शस्त्राने तरूणाचा निर्घृण खून



एरंडोल प्रतिनिधी

बुलेटवर बसलेल्या तरुणाला अज्ञात हल्लेखोरांनी खाली उतरून तरूणावर शस्त्राने सपासपवार करून निर्घृण केला खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली.

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील तरूणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून एरंडोल तालुक्यातील भातखंडे, उत्राण परिसरात निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना दि. १८, शनीवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अमोल उर्फ सोनू देविदास पाटील वय ४०, रा. अंतुर्ली ता. पाचोरा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल पाटील हा व्यवसायिक आहे. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील भातखंडे आणि उत्राण परिसरात अमोलचा मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शास्त्रने वार करून निर्घृण खून केल्याचे रविवारी सकाळी समोर आले .

पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. हा खून करण्यामागचे नेमके कारण जरी समोर आलेले नसले तरी जुन्या वादातून सुपारी देवून खून केल्याचा संशय परिसरातून व्यक्त केला जात असून अशी चर्चाही केली जात आहे. दरम्यान, आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना झाले असून वाळू व्यवसायातील स्पर्धेतून खून झाल्याचीही देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या